Vinayak Raut/Narayan Rsne SaamTV
महाराष्ट्र

लाचार शब्द ज्यांना लागू होतो, ते म्हणजे नारायण राणे; शिवसेना नेत्यांची जहरी टीका

राज ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लाचार शब्द ज्यांना लागू होतो, ती‌ व्यक्ती म्हणजे नारायण राणे. एक वर्षात त्यांचा पक्ष बुडवला. सत्तेसाठी, स्वार्थासाठी लाचारी म्हणजे राणे अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवरती Narayan Rane केली आहे. तसेच राणेंनी उद्धव ठाकरेंवर Uddhav thackeray टीका करू नये. उद्धव ठाकरेंच्या रुपाने एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाले याचा अभिमान आहे असही राऊत म्हणाले. (MP Vinayak Raut has criticized Narayan Rane)

हे देखील पहा -

राज ठाकरे Raj Thackeray यांचे हिंदुत्व बेगडी आहे. भाजप BJP हे मनसेचा शिखंडी म्हणून वापर करीत आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच मुंबई, पुण्याने एक कोटींचा आकडा पार केला. नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंसह (Narendra Modi) सर्वांचे अभिनंदन लसीकरण (Vaccianation) बाबतची ही आनंदाची बातमी असल्याचही ते म्हणाले. डिसेंबरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल तसेच सरकारचे लसीकरण करणे काम आहे. तरुणांसह हे लसीकरण झाले पाहिजे. तरच कोरोना मुक्त देश होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'शिवसैनिक नव्हे; ठाकरे मुख्यमंत्री' हे राणेंचे बेताल वक्तव्य आहे उद्धव ठाकरे हे देखील शिवसैनिकच आहे. म्हणून ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे तसेच मालवणात गर्व से कहो हम हिंदू है, अशी पोस्टरबाजी सुरू झाली आहे. मात्र ही घोषणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांची आहे. ती शिवसेनेकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असंही राऊत म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT