supriya sule, vat purnima, amravati, sadanand sule. saam tv
महाराष्ट्र

सुप्रिया सुळे दिलखूलास... म्हणाल्या, ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास

आज राज्यभरात वटपाेर्णिमा साजरी केली जात आहे. महिला वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी सकाळपासून घराबाहेर पडल्या आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती (vat purnima) : भारतीय संस्कृतीत सौभाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पती असलेले महिला मंगळागौरी पासून तर शेवटपर्यंत सण साजरे करतात. मात्र विधवासाठी कुठलाही सण समारंभ नसतो. याच परंपरेला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आज अमरावती (amravati) येथे विधवा महिलांसमवेत वटपौर्णिमेचे पूजन (vat purnima) करून एक नवा पायंडा अमरावतीत रोवला आहे. (supriya sule celebreated vat purnima)

संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आज सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यात महिला वडाची पूजा करुन जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करीत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हा सण महिलांसह त्यांचे पती देखील साजरा करीत आहेत. पती- पतीने वडाला फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करताना दिसत आहेत.

खासदार सुप्रिया सुळे या अमरावती जिल्हा दाै-यावर आहेत. आज अमरावती येथे सुळे यांनी महिलांसमवेत वटपाेर्णिमा साजरी केली. या सणात विधवा महिलांना देखील त्यांनी सहभागी करुन घेतले. त्यांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम देखील त्यांनी आयाेजित केला आहे. दरम्यान वडाला फे-या मारल्यानंतर सुळेंना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला. यावेळी सुळे म्हणाल्या ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा गजर करीत ज्येष्ठ महिलांनी सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे (sadanand sule) यांना दिर्घायुष्य लाभाे असे आशीर्वाद दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Ishan Kishan: सनरायझर्स हैदराबादला विजयाची हॅट्रिक मिळवून देऊनही इशानचं कर्णधारपद जाणार? काय आहे कारण?

Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

Buldhana Police: बुलडाण्यात पोलिसाला सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT