प्रताप पाटील चिखलीकर संतोष जोशी
महाराष्ट्र

भाजप खासदार चिखलीकर यांना जीवे मारण्याची धमकी; १० कोटींची मागितली खंडणी

सात महिण्यापुर्वी पत्राद्वारे दिली होती धमकी

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

संतोष जोशी

नांदेड: प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरणात 12 दिवस झाले तरीही भरदिवसा झालेल्या हत्येचा तपास थंड बस्त्यात असतानाच नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्याला सात महिण्यापुर्वी कुख्यात गुंड रिंदाच्या नावाने पोस्टाने पत्र आले होते. या पत्रात दहा कोटीची खंडणी मागितली होती आठ दिवसांत खंडणी दिली नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट चिखलीकर यांनी केलाय.

या संदर्भात रिंदाच्या नावाने आलेलं पत्रही चिखलीकर यांनी माध्यमांना दिले. बियाणींच्या हत्ये नंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थे बाबत स्वतः पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वारंवार चिंता व्यक्त केली. अशातच खंडणीसाठी व्यापाऱ्यांना धमक्या येण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

मिळणाऱ्या खंडणीसाठीच्या धमक्यांमुळे सध्या जिल्ह्यात दहशतीच वातावरण आहे. खासदार चिखलीकर यांनी आपल्या सात महिण्यापुर्वी आलेल्या धमकीच्या पत्राची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, स्थानिक राजकीय नेत्याच्या दबावामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चिखलीकर यांनी केलाय. आपण त्यावेळी या पत्राची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, आपण आता धमकीचे पत्र सार्वजनिक करत आहोत आणि या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करत असल्याचे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, खासदारांना गुंडाचे खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र येत असेल तर नांदेड मध्ये सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT