Maharashtra politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीत अजितदादांना स्थान आहे का? खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्याने संभ्रम आणखी वाढला

amol kolhe on ajit pawar : महायुतील श्रेयवादावर खासदारअमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला. अमोल कोल्हे यांच्या टीकेनंतर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया मिळते, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

शुभम देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

गोंदिया : महायुतीमधील प्रमुख पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अजित पवारांनी राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत दौरे सुरु केले आहेत. अजित पवार यांच्या दौऱ्यात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शब्द वगळ्याचे दिसून आले. अजित पवार गटाने मुख्यमंत्री शब्द वगळल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील योजनेच्या देखाव्यात अजित पवार यांचा फोटो गायब असल्याच दिसून आलं. यानंतर महायुतीत अजितदादांना स्थान आहे का, असा प्रश्न अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना पडला असेल, असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचे दिसून आल. अजित पवार यांच्या जागी खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो पाहायला मिळाला. त्यानंतर ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहायला मिळाला.

अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्ष पोस्टरवर लावण्यात आला आहे. यावरून खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. महायुतीत अजित पवारांना स्थान आहे का, असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला असेल, असा टोला कोल्हे यांनी लगावला.

नागपूर हिट अँड रन प्रकरणावर खासदार अमोल कोल्हे म्हणाले, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुण्यातील अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं. वरळीच्या संदर्भातही बघितलं. तेच नागपूरबाबत बघायला मिळत आहे. कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो किंवा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असला तरी अशा प्रकारे गुन्हा झाला असेल तर कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे. शिक्षा झाली नाही तर हे सरकार सर्वसामान्य लोकांचं नाही का, हे लोक विचारल्याशिवाय राहणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरेंचा फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघात दौरा

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT