Amol Kolhe Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe : विश्वास पाटलांच्या टीकेला खासदार अमोल कोल्हेंचं उत्तर; म्हणाले...

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, "विश्वासरावांना सांगण्याइतका मी मोठा नाही.

Ruchika Jadhav

Amol Kolhe : सध्या राजकीय वर्तुळात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशात आता या मुद्दयावर लेखक विश्वास पाटील बोलताना त्यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. यावर वाद करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज घराघरात, मनामनात पोहचावेत म्हणून काय काय प्रयत्न केलेत? असा सवाल त्यांनी केला आहे. (Latest Amol Kolhe News)

"मला वाटतं नाही विश्वासराव असं म्हणाले असतील. मी स्वतः छत्रपती संभाजी महाराज आणि इतिहासाकडे आकर्षित झालो त्याचं कारण विश्वास पाटील यांची छत्रपती संभाजी ही कादंबरी आहे. त्यांच्या संदर्भातील माझी गोड आठवण आहे. मी त्यांना स्वतः म्हणालो की छत्रपती संभाजी राजेंवर लिहा कारण मला स्वतला संभाजी राजेंची भूमिका करायची आहे. मी अनेक वर्षे त्यांना ओळखतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ज्यांच दैवत आहेत, असे आम्ही दोघे आहोत. मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते म्हटले की मालिकेत ते ग्लोरीफिकेशन आहे.", असं अमोल कोल्हे म्हणाले.

विश्वासरावांना सांगण्याइतका मी मोठा नाही

पुढे अमोल कोल्हे म्हणाले की, "विश्वासरावांना सांगण्याइतका मी मोठा नाही. आम्ही दोघे एकाच दिशेने चाललेलो आहोत आणि मला वाटतं की विश्वासराव यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची गरज नाही. गेली आठ नऊ वर्ष अनेक चॅनल अनेक कंपन्यांची उंबरठे झिजवलेत. छत्रपती संभाजी महाराजांवर मला मालिका करायची आहे आणि याला सुद्धा कोणी तयार नव्हते. आज जे कोणी या वादावर उर बडवून बोलत असतील त्या प्रत्येकाने सांगावं की त्यांनी आत्तापर्यंत काय केलं? "

काय म्हणाले होते विश्वास पाटील?

"संभाजीराजांना "धर्मवीर" म्हणून अवघा महाराष्ट्र गेली १०५ वर्षे ओळखतो आहे ! कागदपत्रे साक्ष देतात!! "स्वराज्यरक्षक संभाजी" हे मार्केटेबल टायटल श्री अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच.", असं वक्तव्य विश्वास पाटील यांनी केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT