Bhandara Fire News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara Fire News: उंदरानं दिव्याची वात पळवली अन् घरात आग लागली; मौल्यवान साहित्य जळून खाक

Fire News: बुधेश्वर रासेकर यांनी सकाळी देवासमोर पूजा-पाठ करुन दिवा पेटवून कामानिमित्त घराबाहेर गेले. तेव्हा घरी आई, पत्नी, दोन मुले होती. आई सुमित्रा घराबाहेर असतांना तिला घरातून धूर येत असल्याचे दिसले.

Ruchika Jadhav

शुभम देशमुख

Mouse Set Fire to House:

भंडारा जिल्ह्यातून एक चकित करणारी घटना समोर आली आहे. एका उंदराने घरात धुमाकूळ घातल्याने आग लागलीये. एक उंदिर दिव्याची जळती वात घेऊन पळून गेल्याने घराला आग लागली आहे. या उंदराने केलेल्या करामतीची सध्या गावभर चर्चा सुरू आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यांतर्गत येत असलेल्या बारव्हामधील एका घरातील माजघरात देवासमोर पूजा करुन दिवा लावण्यात आला होता. याच दिव्याची वात उंदराने पळविली अन् घराला आग लागून साहित्यांचे नुकसान झाले. ही घटना लाखांदूर येथील वार्ड क्र.३ मधील बुधेश्वर रघुनाथ रासेकर यांच्या घरी घडलीये.

बुधेश्वर रासेकर यांनी सकाळी देवासमोर पूजा-पाठ करुन दिवा पेटवून कामानिमित्त घराबाहेर गेले. तेव्हा घरी आई, पत्नी, दोन मुले होती. आई सुमित्रा घराबाहेर असतांना तिला घरातून धूर येत असल्याचे दिसले. घरात गेली तेव्हा घराला आग लागल्याचे दिसून येताच तिने आरडाओरड केला. आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविली.

आगीत मात्र घरातील जिवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती महसूल विभागाला मिळताच तहसीलदार वैभव पवार यांचे मार्गदर्शनात तलाठी आशिष खामनकर व त्यांचे सहकारी खुशाल दिघोरे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. या घटनेत बुधेश्वर रासेकर यांचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT