Sweet Shop Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Sweet Shop Viral Video : उंदराचा चविष्ट लाडू; मिठाईच्या दुकानात उंदरांचा सुळसुळाट, नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून मिठाईप्रेमी मिठाई खाताना १० वेळा विचार करतील.

Ruchika Jadhav

Mouse in Sweet Shop : सण म्हटलं की, प्रत्येकाच्या घरी मिठाई खाण्याची मोठी मज्जा असते.अनेक मिठाई प्रेमी असेही आहेत ज्यांना मिठाई खाण्यासाठी सणाची गरज नसते. मनात आलं की ते लगेचच मिठाईच्या दुकानावर पोहचतात. मिठाईचे पदार्थ दूधापासून बनवले जातात. त्यामुळे २४ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास ते खराब होतात. मिठाई खाताना किंवा अन्य कोणताही पदार्थ खाताना योग्य ती सुरक्षा घेणे गरजेचे असते. अशात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून मिठाई प्रेमी मिठाई खाताना १० वेळा विचार करतील. (Mouse in Sweet Shop)

मिठाईच्या दुकानात एकाच वेळी जास्त प्रमाणात मिठाई बनवली जाते. मात्र तसे असले तरी योग्य ती सुरक्षा आणि स्वच्छता ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. पण काही दुकानांमध्ये मिठाईवर माश्या फिरताना दिसतात. अशात सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये माश्या नाही तर चक्क एका उंदीर मामाने धुमाकूळ घातला आहे.

ग्राहकाने पाहता क्षणी मिठाईच्या प्रेमात पडावं अशा पद्धतीने या मिठाया सजवण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर मध्येच एक उंदीर फिरताना दिसत आहे. हा उंदीर फक्त इथे फिरत नाही तर तो स्वत:या मिठाईचा मस्त अस्वाद देखील घेत आहे. उंदराचा हा व्हिडिओ पालघरमधील एका मिठाईच्या दुकानामधला आहे. ज्यावेळी उंदीर बिंधास्त मिठाईवर ताव मारत असतो तेव्हा हॉटेल मालक देखील तिथेच असल्याचे दिसत आहेत.

आपल्या दुकानात उंदीर आहे ही गोष्ट कदाचित त्या दुकान मालकाच्या लक्षात आली असावी. मात्र तरी देखील त्याने थोड्याशा पैशांसाठी दुकान मालक नागरिकांच्या आरोग्याशी हेळसांड करत आहे. एका तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केला आहे. सध्या सोशल मीडियावर उंदीर, मिठाई आणि या दुकानाचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. संबंधित दुकान मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

SCROLL FOR NEXT