nashik accident news, mother, child saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Accident News : महाराष्ट्रात मंगळवार ठरला घातवार ! किंकाळीचा आवाज येताच गाड्या थबकल्या, मायलेकींचा झाला होता...

राज्यातील विविध भागात आज अपघात झाले असून यामध्ये मनुष्यहानी झाली आहे.

Siddharth Latkar

- तबरेज शेख / फैय्याज शेख

Nashik News : अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात तसेच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातानंतर नाशिक (nashik) जिल्ह्यातून देखील एका दुर्देवी घटनेची माहिती समाेर आली आहे. द्वारका - आडगाव मार्गावर उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात आई (mother) आणि मुलीचा (girl) जागीच मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

बुलढण्यात भीषण अपघात

नाशिक जिल्ह्यातील अपघाताची माहिती समाेर येण्यापुर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील (buldhana accident news) पळसखेड चक्का गावानजिक झालेल्या भीषण अपघातात आठ ठार 13 जण जखमी झाले आहेत. 

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक ठार

आज पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघाताची (Mumbai-Pune Expressway Accident News) खोपोलीनजीक झालेल्या या अपघातात एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती उपल्बध झाली आहे.

शिरोळ फाट्यावर महिलेचा मृत्यू

दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावर (mumbai nashik highway accident news) शिरोळ फाट्यावर एका महिलेला भरधाव येणाऱ्या पाण्याच्या टॅक्टरने चिरडले. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अजनुप गायदरा येथील जैवंती देऊ भोईर (वय 65) या नातेवाइकांकडे जत होत्या.

मुंबई नाशिक महामार्गावर शिरोळ फाट्यावर महामार्ग ओलांडताना शिरोळ उतार हून भरधाव येणाऱ्या पाण्याच्या टॅक्टर चालकाचा टॅक्टरवरील वेग न आवरल्याने भाेईर यांना धडक बसली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधीच तुकाराम मुंढेंचा धमाका, भेसळखोरांवर धडक कारवाई; कोट्यवधींचं तेल, भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त

निवडणुकीत गडबड झाली तर याद राखा; SIRच्या वादादरम्यान सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलं

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणातून आणखी दोन आरोपी ताब्यात

मोठी बातमी! राज्यातील २५ सरकारी विद्यालयांची नावे बदलली; तुमच्या परिसरातील शाळेचे नाव काय झाले? पाहा यादी

Maharashtra News Live Update: देवी विसर्जनात ध्वनिप्रदूषणाचा मर्यादा ओलांडली, न्यायलयाच्या निर्णयाचंही उल्लंघन, आवाज फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT