Monsoon: विदर्भात विजांचा कडकडाट; 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon: विदर्भात विजांचा कडकडाट; 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

राज्यात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्यानंतर, विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. हवामान खात्याकडून IMD पुढील दोन दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: राज्यातून मागील जवळपास तीन आठवड्यांपासून पाऊस Rain पूर्णपणे गायब झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण पूर्णपणे कमी झाले आहे. राज्याच्या मध्य महाराष्ट्र भागात तसेच मराठवाडा आणि खानदेश मध्ये पावसाने उघडीप घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्यानंतर, विदर्भात Vidarbha पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. हवामान खात्याकडून IMD पुढील दोन दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद तसेच आज मुंबई, पुण्यासह काही भागात करण्यात आली आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण ११ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.

हवामान तज्ज्ञांकडून त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली आडोशाला उभा न राहण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आलाय. पण पावसाचे प्रमाण राज्यात इतरत्र मात्र चालू आठवड्यात कमीच राहणार आहे आणि पुढील आठवड्यात राज्यात मान्सूनची वापसी होण्याची शक्यता आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT