kokan and mumbai, Unseasonal rains in Mumbai, Mumbai Rain News Updates Saam Tv
महाराष्ट्र

आनंदाची बातमी! पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या उपसागरावर धडकणार

यंदा वेळेच्या अगोदरच मान्सूम केरळध्ये दाखल होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: यंदा वेळेच्या अगोदरच मान्सूम केरळध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत मान्सून बंगालच्या (Bengal) उपसागरावर दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ (Hurricane) निवळत आहे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांकरिता पोषक वातावरण (Atmosphere) निर्माण होत आहे. यामुळे विनाअडथळा मान्सून दाखल होणार आहे.

हे देखील पाहा-

दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५ मे दिवशी मान्सून दाखल होणार असल्याचे अंदाज हवामान अगोदर येण्याची शक्यता वर्तवली होती. यामुळे राज्यात (state) विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात असलेली उष्णतेची लाट पुढचे २-३ दिवस कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि कोकणामध्ये (Konkan) हवामान कोरडे राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून पुढील २ दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मेच्या दरम्यान दाखल होत असतो.

मात्र, अनुकूल स्थितीमुळे तो ५ दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत मान्सून अंदमान- निकोबार बेटांचे संपूर्ण क्षेत्र, अंदमानचा समुद्र आणि मध्य- पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापणार आहे, अशी माहिती मिळत आहे. यामुळे यंदा केरळात वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खूशखबर आहे. पुढील ४ आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्यची शक्यता वर्तवली आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Railway Station : संतापजनक! रेल्वे स्टेशनवर प्रवाशाला शिव्या दिल्या, कॉलर पकडली; कारण फक्त समोसा

मोलकरणीसोबत शारीरिक संबंध अन्.. पत्नीनं पुस्तकातून बॉलिवूड अभिनेत्याबद्दल केले धक्कादायक खुलासे

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

SCROLL FOR NEXT