Bhushi Dam 
महाराष्ट्र

Bhushi Dam: सावधान! मान्सून पिकनिक बेतेल जीवावर; नको ते धाडस कराल जीवाला मुकाल

Bhushi Dam: लोणावळ्याच्या भुशी धरणाजवळच्या धबधब्यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ताम्हीणी घाटात आणखी एका तरुणाचा मृत्यू झालायं. त्यामुळे मान्सून पिकनिक जीवावर बेतल्याचं दिसतंय. त्यामुळे मान्सून पिकनिकला जात असाल तर काळजी घ्या.पाहूया यावरचा एक रिपोर्ट

Tanmay Tillu

पाऊस पडलाय, मौसम मस्ताना आहे, मान्य. त्यामुळे डोंगर,धबधबे पर्यटकांना खुणावतायत. हेही मान्य. मात्र तुमची वन डे ट्रिप तुमच्याच जीवावर बेतू शकते. कशी ते या दोन भयानक दृष्यांमधून पाहा.

पाहीलतं न. ही दोन दिवसातील दोन दृष्य. पहिलं भूशी डॅम परिसरात फिरायला गेलेल्या अन्सारी कुटुंबाचं. या घटनेचा मन सून्न करणारा व्हिडीओ समोर आलाय़. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं. या परिसरात 15 मिनिटांसाठी जरी पाऊस पडला तरीदेखील धबधब्याचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढतं. या पाण्याचा अन्सारी कुटुंबाला अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली. दुसरी घटना ताम्हीणी घाट परिसरातील. इथे 32 वर्षीय तरुणाला अतिउत्साह नडलाय.स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. स्वप्नील बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू होता. त्याचआधारे भारतीय सैन्यात त्यानं सेवा बजावली होती.मात्र नसतं धाडसं जीवावर बेतलंय.

दरम्यान, लोणावळ्यातील मन सून्न करणाऱ्या घटनेची आपबीती अन्सारी कुटुबातील त्यांचे नातेवाईक ईस्माल यांनी सांगितलीये. लोणावळ्यातील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळी पर्यटन स्थळांवर संध्याकाळी 6 नंतर जाण्यास संचारबंदी लागू केलीये. तर या घटनेची दखल पावसाळी अधिवेशनातही घेण्यात आली. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटलांनी याबाबत प्रतिबंधक आदेश जारी करण्याचे आदेश दिले.तर नाना पटोलेंनी सरकारला सवाल केलेत.

पावसाळी पर्यटनाला जाताना सावधता बाळगा हे नेहमी सांगितलं जातं.मात्र तरीही आपला जीव धोक्यात घालून पर्यटक नसतं धाडसं करतातचं. खरंतर ग्रामीण भागात असलेल्या या पर्यटन क्षेत्रांवर पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यानं या पर्यटकांसाठी चहा, नाश्त्याची दुकानं लावून स्थानिकांना मोठा रोजगार मिळतो. मात्र या मनाई आदेशामुळे स्थानिकांचा रोजगार बुडणार आहे. पर्यटकांचा अतिउत्साह आणि उन्माद पाहता शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं मत देखील व्यक्त होतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT