ही हाय नंदुरबारची रघुवंशी शाळा... सध्या माकडामुळं जोरदार चर्चेत हाय... माकडामुळं शाळलाच लागलंय टाळं... शाळच्या मैदानापासनं ती गच्चीपर्यंत अन् गच्चीपासनं ती वरांड्यापर्यंत नुसता माकडाचा धिंगाणा.. या माकडांनं एकच नाय तर नंदरबारच्या दोन शाळांना लावलंय टाळं... दुसरी शाळा हाय काणे विद्यालय... मागच्या दोन ते तीन दिवसांपासनं या शाळांमधी माकडांचा हैदोस हाय...
माकाड आलं म्हणून बघायला गेलेल्या दोन पोरांवर माकडानं हल्ला केला.. त्यांना वाचवायला गेलेल्या शिक्षकाला बी माकडानं दणका दिलाय . या हल्ल्यात तिघं बी जखमी झालेत... माकडाच्या हल्ल्यात आजून विद्यार्थी जखमी नकू म्हणून शाळनं थेट सुट्टीच जाहीर केली
माकडाला पळवून लावायचा प्रयत्न केला तरी माकाड काय जायना... अखेर फॉरेस्टची माणसं पिंजारा घीवून जागेवर हजर... कुठं लावला पिंजरा.. तर कुठं लावलं जाळं... पण माकाड काय घावनं... फॉरेस्टवालं बी दमलं...
माकडांना जेरबंद करण्यासाठी मोठा प्लान आखला... एक दोन नाय तर 22 फॉरेस्टवालं शाळंच्या मैदानात तैनात... पण काय केल्या माकाड जाळ्यात येणा.. शेवटी माकाड ती माकाड... जवर माकाळ जाळ्यात येत नाय तर शाळा काय सुरु होत नाय...
असो शेवटी काय माकडाच्या करामतीमुळं विद्यार्थ्यांची मजा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.