Nagpur Crime News SaamTv
महाराष्ट्र

Crime News : Nagpur News: मित्राच्या पत्नीचे अपहरण केले, जंगलात नेऊन केले अत्याचार; त्यानंतर घडलं ते भयंकर

या धक्याने घाबरलेल्या पीडित महिलेने घरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर (wife) अत्याचार केल्यानंतर पीडित महिलेनं (women) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपूर जिल्ह्यात समाेर आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Nagpur Latest Marathi News)

नागपूर जिल्ह्यातील मौंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा नागपुरातील मेडिकल रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. पतीच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून ही घटना केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra News)

पतीचा आणि मुलाचा अपघात घडवून खून करण्याची धमकी देऊन संशियत आरोपीने मित्राच्या पत्नीचे अपहरण केले. तिला जंगलात नेेलं. तेथे तिच्यावर अत्याचार करुन पुन्हा घरी नेऊन सोडले.

या धक्याने घाबरलेल्या पीडित महिलेने घरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी सतीश जौंजाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हेमंतकुमार खराबे (पोलीस निरीक्षक. मौदा पोलीस स्टेशन) म्हणाले, संशयित आरोपी सतीश हा चालक आहे. ताे पीडित महिलेच्या पतीचा मित्र आहे. पीडित महिलेने या प्रकरणी मौदा पोलीस ठाण्यात सतीश याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : कामात नवी संधी मिळेल! ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

SCROLL FOR NEXT