sushma andhare  saam tv
महाराष्ट्र

Mohit Kamboj vs Sushma Andhare: सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी...; भाजप नेत्याचं खोचक ट्वीट

सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल केला. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट आव्हान दिलं.

साम टिव्ही ब्युरो

Sushma Andhare : सध्या राज्याचं राजकीय वातावरण फार तापलं आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी ठाणे पोलिस आयुक्तालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लबोल केला. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट आव्हान दिलं. त्यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारेंवर घणाघात केला आहे. (Political News)

राखी सावंतशी केली तुलना

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, "सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात. या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत, असं टीकास्त्र कंबोज यांनी सुषमा अंधारेंवर सोडलं आहे. तसेच दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा असते, असं देखील त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे

मुख्यमंत्र्यांना फडतूस म्हणू नये मान्य मग दादा, भाऊ म्हटल्यावर तुमचे आमदार आम्हाला शिवीगाळ करतात, तर आम्ही काय करणार?, असे सुषमा अंधारे म्हणाले. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना महाष्ट्रात फिरु देणार नाही, या चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) वक्तव्याचा देखील सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. "बावनकुळे यांच्यात हिंमत असेल तर त्यानी ४८ तासात मातोश्रीवर यावे," असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT