राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे वासनिक यांच्या हस्ते लोकार्पण. 
महाराष्ट्र

मोदी सरकारमुळे लोकशाहीच संकटात, काँग्रेसचे वासनिक कडाडले

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा ः बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे लोकसहभागातून ऑक्सिजन प्लँटची निर्मिती केली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी वासनिक यांनी कोविड काळातील सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून व आक्रमक टीका केली.

राजीव गांधी प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण वासनिक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे कोविडच्या रूग्णांना प्राणवायू मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी वासनिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते चिखली येथे बोलत होते. Modi government criticizes Congress leader Mukul Wasnik

शासनात ज्या लोकांनी भारतीय घटनेला साक्षी ठेऊन शपथ घेतली आहे. आज त्याच लोकांपासून भारतीय घटनेला आव्हान आहे, हे स्वातंत्र्य दिनी समजून घेतलं पाहिजे. याच लोकांपासून भारताच्या संसदेला, न्याय व्यवस्थेला व लोकशाही व्यवस्थेला धोका आहे.

या देशात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही तर मग आर्मी, नेव्ही, रेल्वे कशासाठी कामाला लावली होती, असा सवालही वासनिक यांनी केला. जगात 21 कोटी 77 लाख 26 हजार 483 लोकांना कोव्हिडची बाधा झाली होती. 43 लाख 83 हजार 81 लोक मृत्युमुखी पडले, हा अधिकृत आकडा किती खरा, किती खोटा हे कुणीही सांगू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.Modi government criticizes Congress leader Mukul Wasnik

आपल्या देशात 3 कोटी 22 लाख नागरिकांना कोव्हिड झाला तर 04 लाख 31 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. हा आकडा संशयास्पद आहे. गर्दीत, गंगेत किती प्रेत सोडली, गंगाकिनारी किती गाडली, याची आकडेवारी सरकारकडे नाही. ही भयानक परिस्थिती आहे, असा आरोपही वासनिक यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा, ६० कोटींचा डल्ला अन् १०० बनावट खाती, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

SCROLL FOR NEXT