Maharashtra six Leaders In Modi Government 
महाराष्ट्र

Modi 3.0 Cabinet: देशात मोदी सरकारच्या ३.० पर्वाला सुरुवात; पहिल्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा षटकार; 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Maharashtra six Leaders In Modi Government : आज पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींनीनंतर राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या क्रमांकावर, अमित शाह यांनी तिसऱ्या क्रमांकावर तर, नितीन गडकरी यांनी चौथ्या नंबरवर शपथ घेतली. यावेळी महाराष्ट्रातील ६ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Bharat Jadhav

आजपासून देशात मोदी ३.० च्या पर्वाची सुरुवात झालीय. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून महाराष्ट्रातील ६ नेत्यांना आज राष्ट्पतींमार्फत शपथ देण्यात आलीय. केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रानं षटकार मारलाय. शपथविधीसाठी राज्यातून ६ खासदारांची वर्णी लागलीय.

भाजपमधून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळालंय. तर रामदास आठवले यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचं स्थान कायम राखलंय. तर शिंदे गटाकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी लागलीय.

शपथ घेणारे महाराष्ट्रातील नेते

नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री)

पीयूष गोयल (कॅबिनेट मंत्री)

प्रतापराव जाधव (राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार)

रामदास अठावले (राज्यसभा, राज्य मंत्री)

रक्षा खड़से (राज्य मंत्री)

मुरलीधर मोहोळ (राज्य मंत्री)

दरम्यान, नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव, सिंदखेडराजा, धुळे आणि गोंदियात जल्लोष साजरा करण्यात आलाय. सिंदखेडराजा येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय. तर धुळ्यात फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरत जल्लोष केलाय. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात देखील भाजपचाकडून जल्लोष करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT