Dhule Mock Drill Saam TV
महाराष्ट्र

Dhule Mock Drill goes Wrong : मॉक ड्रील पडलं महागात, खोट्या दहशतवाद्याला खराखुरा चोप, VIDEO व्हायरल

Dhule News : पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

भूषण अहिरे

Dhule News : अनेकदा पोलीस विविध गोष्टींवर मॉक ड्रील करून तयारींची चाचपणी करत असतात. असेच एक दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल पोलिसांच्या चांगलचे अंगलट आले आहे. खोटा दहशतवादी एका नागरिकाला ओलीस ठेवून वातावरण निर्मिती करत असताना संतापलेल्या एका नागरिकाने त्याला चांगलाच चोप दिला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरले असल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आला. यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याचा थरार यावेळी धुळेकरांनी अनुभवला. मात्र हे पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. (Maharashtra News)

मात्र यावेळी दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीलाच एका नागरिकाने चोप दिल्याचा प्रकार घडला. यावेळी चोप देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले. फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात वाजला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेला सतर्क केले. (Crime News)

काही वेळातच शहरातून सायरन वाजवत पोलिसांची वाहने मंदिराजवळ पोहोचली. मंदिर परिसरात यावेळी एकच धावपळ उडाली. मंदिरात शिरलेल्या दहशतवाद्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन चौघा भाविकांची सुखरूप सुटका केली. हा सगळा थरार धुळेकर नागरिकांनी काल सायंकाळी अनुभवला.

परंतु, या दहशतवादी नाटकामुळे मुले रडत आहेत, नागरिक घाबरले आहेत, या कारणामुळे एका नागरिकाने त्या दहशतवाद्यावरच हात उगारले. दोन-तीन कानशीलातही लगावल्या. हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी स्वामीनारायण मंदिराच्या कॅन्टीन परिसरात नागरिक कुटुंबीय समवेत बसले असताना दहशतवादी आत शिरताच त्यांनी केलेल्या बंदुकीच्या फायरिंगच्या आवाजामुळे काही महिला आणि लहान मुले प्रचंड घाबरली होती.

यामुळे या संतप्त झालेल्या नागरिकाने दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्यालाच चोप दिला. या चोप देणाऱ्या नागरिकाला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेत हे ट्रेनिंगचा एक भाग असल्याचे सांगिघतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

सुनेत्रा पवारांची सभा सुरू असतानाच सुप्रिया सुळेंची एंट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT