Solapur Teacher News Saam TV
महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षकांना शाळेच्या वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी

शाळेच्या वेळेत शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर आता निर्बंध लागू केले जाणार आहेत. तसंच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सध्याच्या काळात मोबाईलशिवाय राहणं म्हणजे अशक्यप्राय असं काम आहे. कारण कोणतंही काम असो ते मोबाईद्वारे करण्याची आपणाला सवय झाली आहे. मग ते (Mobile) आपले आर्थिक व्यवहार असो गाडी बुकींग असो अशी सर्व काम आपण मोबाईलद्वारे करतो. शिवाय आपलं मनोरंजन करण्यासाठी तर त्याचा भरपूर उपयोग होतो. मात्र, हाच मोबाईल आपल्या कामाच्या वेळेत वापरला तर आपलं कामावरुन दुर्लक्ष होतं हे देखील तेवढेच खरं आहे.

कोरोना काळापासून (Corona) तर अगदी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना मोबाईलचाच आधार होता. मात्र, आता शाळा सुरु झाल्या असून सोलापुरमध्ये (Solapur) प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मोबाईल वापरण्यावरती आता निर्बंध लागू केले जाणार आहेत. शिवाय शाळेच्या (School) सुट्टीतच शिक्षकांना मोबाईल वापरता येणार आहेत.

हे देखील पाहा -

मुलांना अध्यापन करत असताना शिक्षक मोबाईल वापरू शकत नाहीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. तसंच प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढून सर्व विद्यार्थी स्पर्धाक्षम बनावेत, या हेतूने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा कृती आराखडा तयार केला आहे.

शाळेच्या वेळेत शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर आता निर्बंध लागू केले जाणार आहेत. तसंच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यावर शाळा व्यवस्थापन समिती वॉच ठेवेल, असेही त्यांनी सांगितले. मुलांना शिकवताना त्यात व्यत्यय नको म्हणून हा आदेश नवीन शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातून धावणार आणखी एक एक्सप्रेस, कोणत्या स्थानकावर थांबणार? किती असणार तिकिट? वाचा A टू Z माहिती

Kairi Chutney Recipe: भाजलेल्या कैरीची 'चटपटीत' आंबट- गोड चटणी, अवघ्या १० मिनिटांत बनवा, नोट करा 'ही' रेसिपी

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला

प्रसिद्ध आनंदलोक रुग्णालयात अग्नितांडव; जिकडे तिकडे धुराचे लोट, खिडक्या तोडून रुग्णांनी वाचवला जीव

Chandrapur: १० वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेची तयारी करताना खाली पडला; आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण

SCROLL FOR NEXT