MNS Leader Vaibhav Khedekar  Saam TV
महाराष्ट्र

MNS Vaibhav Khedekar: मनसे नेते वैभव खेडेकर पुन्हा अडचणीत; अटकेची टांगती तलवार?

MNS Vaibhav Khedekar: गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणावरून मनसे नेते वैभव खेडेकर हे अडचणीत सापडले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

>> जितेश कोळी

MNS Vaibhav Khedekar News खेड : कोकणातील (Konkan) मनसेचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. गणेशोत्सव काळातील (Ganpati Festival) लॉटरी प्रकरणात ते गोत्यात आले होते. आता याच प्रकरणात त्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी खेडेकर यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खेडेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणावरून मनसे नेते वैभव खेडेकर हे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कालच अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. यानंतर आज, समाज कल्याण विभागाचे रत्नागिरीच्या सहायक आयुक्तांनी खेडेकर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार केली आहे.  (Maharashtra News)

सहायक आयुक्तांच्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे खेडेकर यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी मनसे नेते वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात होती. या प्रकरणात अटकेपासून सरंक्षण मिळावे यासाठी खेडेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

गणेशोत्सव काळातील लॉटरी प्रकरणी खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्यांच्या अटकेसाठी पोलीस त्यांचा शोध घेत होते. गुरुवारी या प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT