Aurangabad MNS 54 Rs Liter Petrol MNS/ Tweeter
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५४ रुपयांत १ लिटर पेट्रोल; पंपाबाहेर वाहनांच्या रांगा

औरंगाबादेत सकाळीच पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. अशातच राज्यभरातील तमाम मनसैनिकांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे राज यांच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 54 रुपये लिटरने पेट्रोल देण्याचा निर्णय औरंगाबादेतील (Aurangabad) मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. औरंगाबादेतील मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (MNS Raj Thackeray birthday Aurangabad 54 Rs Liter Petrol)

सकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान शहरातील क्रांती चौका पेट्रोल पंपावर प्रत्येकी 1 लिटर पेट्रोल 54 रुपये लिटरने दिले जाणार असल्याच खांबेकर म्हणाले. त्यामुळे कमी किमतीत पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. मागील वर्षभरापासून पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

1 लिटर पेट्रोल घेण्यासाठी वाहनधारकांना जवळपास 115 रुपये मोजावे लागत आहे. अशातच राज यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनं कमी दरात पेट्रोल देऊन नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं आहे.

दरम्यान, कोरोना आणि त्यानंतर आता शस्त्रक्रिया करावयाची असल्यामुळे राज ठाकरे यांनी उद्या कुणीही भेटण्यासाठी येऊ नये असे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे. "वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या" असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाढदिवसानिमित्त मनसैनिकांना आवाहन केले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT