Raju Patil News  saam tv
महाराष्ट्र

Raju patil| 'कल्याण डोंबिवली महापालिका फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट'; आमदार राजू पाटील यांची टीका

मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विट करत आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे,अशी शब्दात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

प्रदीप भणगे

Raju patil News : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केडीएमसी आणि अधिकारी यांना स्मार्टसिटीवरून चांगलेच सुनावले. कल्याण डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे आणि अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुनावले. केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी खडेबोल सुनावल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विट करत आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे,अशी शब्दात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघाचा तीन दिवसीय अभ्यास दौरा करण्यासाठी अनुराग ठाकूर कल्याण डोंबिवली शहरात आले आहेत. या दौऱ्यादरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली.

'कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. ज्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे, त्या ठिकाणी बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे आणि आधिकर्यांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुनावले.

दरम्यान, केडीएमसीमध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता राहिली आहे. खासदार,आमदार आणि नगरसेवक सुद्धा शिवसेना-भाजपचे राहिले आहेत. त्यामुळे यांचे अंकुश अधिकाऱ्यांवर नव्हते का?  असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आणि ठाकूर यांना टॅग करत ,'आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो. बरं झाले आपणच घरचा आहेर दिला, अशा शब्दात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापालिकेवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT