MNS-Aditya Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

MNS Gudi Padwa Rally: संपलेला पक्षच आदित्य ठाकरेंना त्यांची लायकी दाखवेल, मनसेच्या मेळाव्यात जहरी टीका

Political News: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे हा पक्ष सत्तेत असल्याशिवाय राहणार नाही

साम टिव्ही ब्युरो

MNS Gudi Padwa Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यातून मनसेच्या संदीप देशापांडे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनसे संपलेला पक्ष आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टिकेला उत्तर देताना हाच पक्ष आदित्य ठाकरेंना त्यांची लायकी दाखवेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

दिवंगत बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण मनसेने पूर्ण केलं. त्यांची इच्छा होती मशीदीवरील भोंगे उतरवावे. ते भोंग उतरवण्यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरले होते. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे हा पक्ष सत्तेत असल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं. (Political News)

मनसे पक्षाला स्थापन होऊन 17 वर्ष झाली. या 17 वर्षात आपण मोठा संघर्ष केला. मनसे कार्यकर्ते निवडणुकीत यश आले किंवा अपयश आले, कधीही घाबरले नाहीत. संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरायला कधीही मागे हटले नाही. अपयशाला घाबरु आणि यशाने माजू नका ही शिकवण आम्हाला राज ठाकरेंनी दिली, असं संदीप देशपांडे म्हणाले.

आम्हाला राज ठाकरे साहेबांचा अभिमान आहे. कारण आमच्या नेत्याने जे मिळवलं ते स्वकर्तृत्वाने मिळवलं. कुणाचातरी मुलगा म्हणून आम्हाला काही मिळालेलं नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT