अमरावतीत अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावतीत अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप

अमरावती शहरातील रेन्बो हॉस्पिटलमध्ये कंत्राटी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या कंत्राटदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱयांनी भर रस्त्यात चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अरुण जोशी

अमरावती : अमरावती शहरातील रेन्बो हॉस्पिटलमध्ये कंत्राटी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या कंत्राटदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱयांनी भर रस्त्यात चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मागील कित्येक दिवसापासून सदर कंत्राटदार हा रुग्णालयाच्या महिला सुरक्षा रक्षकांना असभ्य वागणूक देत असल्याच्या तक्रारी मनसे पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या.

हे देखील पहा -

पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते. ड्रेसचे मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे आणि विरोध करणाऱ्या महिलांना तक्रार केली म्हणून कामावरून काढून टाकणे, आणि त्यांचा पगार आणि पीएफ सुद्धा कापण्याची हुकूमशाही करण्यापर्यंत या विकृत प्रवृत्तीच्या लोकांची मजल गेली होती.

कामावरून काढलेल्या महिलांनी मनसेचे शहराध्यक्ष गौरव बांते यांच्याकडे तक्रार करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारास भर रस्त्यात चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या सुपूर्द केले. मुख्य रस्त्यावर सुरु असलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जोगेश्वरी पूर्वेत मातीने भरलेला डंपर बेस्ट बसवर कलंडला; महिला प्रवासी जखमी

Thane Crime : वर्गमित्रांनीच केला घात; संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर बोलावलं, निर्जनस्थळी नेलं अन्... धक्कादायक कारण उघड

अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर; न्यायालयानं कोणत्या ठेवल्या अटीशर्ती?

Pune : पांढरी वाळू, निळेशार पाणी अन् नारळ-सुरूची झाडं, पुण्याजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Stomach Pain: पोटदुखीला गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? मग शरीराने दिलेले हे गंभीर संकेत वेळीच ओळखा!

SCROLL FOR NEXT