नितीन पाटणकर, पुणे | 09 डिसेंबर 2023
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जबाबदारी दिली आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत चोख पार पाडायची या इराद्यानंच अमित ठाकरे रणांगणात उतरल्याचं दिसत आहेत. पुण्यात आज, शनिवारी विभाग अध्यक्षांच्या बैठकीत त्याची प्रचिती आली. जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बदला, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी कडक इशारा दिला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभेचे (Loksabha) पुण्यातील प्रभारी म्हणून अमित ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलं आहे. पुण्यात शनिवारी त्यांनी विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आढावा घेतला. जे पदाधिकारी काम करत नाहीत, त्यांची पदे बदला अशा थेट सूचनाच ठाकरेंनी विभाग अध्यक्षांना केल्या.
लोकसभा निवडणूक (Loksabha Elections 2024) अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी पक्ष संघटना मजबूत असणे आवश्यक आहे, असे अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. ते बैठक घेणार असून पुणे मतदारसंघाचा (Pune) आढावा घेणार आहेत. दुसरीकडे, पुण्यात मनसेचा मेळावा होणार आहे. त्यासाठी मनसेने (MNS) जय्यत तयारी सुरू केली आहे, अशी माहिती आहे.
लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होऊ घातल्या आहेत. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावा घेतला जात आहे. मनसेही पूर्ण ताकदीनं मैदानात उतरल्याचं चित्र आहे. अलीकडच्या काळात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील काही भागांत दौरेही केले आहेत. पुण्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची जबाबदारी त्यांनी अमित यांच्यावर दिलीय. त्यानुसार, ते कामालाही लागले आहेत. बैठकांच्या माध्यमातून त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.