Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: वळसे पाटील यांच्यासमोरच राडा; मोहोड यांच्या नियुक्तीला मिटकरींकडून विरोध, बाचाबाचीचा व्हिडिओ आला समोर

Akola News: अकोल्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात हा प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

हर्षदा सोनोने

Akola News:

अकोल्यामधून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यासमोरच शिवा मोहोड यांच्या नियुक्तीला अमोल मिटकरी यांनी केला विरोध केल्याची घटना घडली आहे. अकोल्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

गेल्या वर्षभरापूर्वी अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांनी एकमेकांवर केले होते. दोघांमधील वाद कायम असताना अजित पवार गटाच्या मेळाव्यात शिवा मोहोड यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

दिलीप वळसे पाटील यांनी मिटकरी यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. त्यानंतर या नियुकीचा मिटकरी यांनी स्टेजवरच विरोध केला. त्याचबरोबर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची धमकी त्यांनी स्टेजवर दिली.

तत्पूर्वी, शिवा मोहोड यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे मिटकरी संतापले. त्यांनी मोहोड यांच्या निवडीचा निषेध केला.

मिटकरी आणि मोहोड यांचा वाद काय?

गेल्या वर्षी मोहोड यांनी मिटकरी कामासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. मोहोड यांनी यासहित इतरही गंभीर आरोप केले होते. मिटकरी आणि मोहोड यांच्यातील वाद चर्चेत होता. त्यावेळी मिटकरी आणि मोहोड यांच्यात बिनसल्यानंतर पक्षातील नेत्यांनी वाद सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT