Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'आमचं निलंबन होणार नाही; कारण...'; शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला विश्वास

Kalyan Politics: सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कसलीही भीती नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Politics: 'काही लोक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. निर्णय वेगाने घ्या की हळू हळू घ्या. आमचे निलंबन होणार नाही. आम्ही सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कसलीही भीती नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे आमदार सूनिल प्रभू सर्वोच्च न्यायालयात लवकर सुनावणीसाठी याचिका दाखल केली आहे. त्याबाबत आमदार भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे फडणवीस सरकारामध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. हे सर्व सुरु असताना ठाकरे गटाचे आमदार सूनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, १६ आमदारांच्या आपत्रतेसंदर्भात निर्णयासाठी विलंब केला जात आहे. त्यासाठी न्यायालायने दखल घ्यावी. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी या प्रकरणी १४ दिवसात उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर १६ आमदारांचे काय होणार ही चर्चा राजकारणात सूरु झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास - भोईर

'आमदारांच्या निलंबनाबाबत त्या प्रक्रियेला वेग येणार अशा बातम्या प्रसार माध्यमावर सुरु आहेत. खरं तर हे बऱ्याच दिवसापासून सुरु आहेत. काही लोक देव पाण्यात बुडवून बसले आहेत. निर्णय वेगाने घ्या की हळू हळू घ्या. आमचे निलंबन होणार नाही. आम्ही सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून केल्या आहे. सर्वोच्च न्यायालयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कसलीही भीती नाही, असा टोला ठाकरे गटाला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT