Sindhudurg , Nitesh Rane, Vaibhav Naik, NCP, Shiv Sena saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg News : ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन... नितेश राणेंच्या विधानावर नाईक म्हणाले, हिम्मत असेल तर...

शरद पवार यांच्याबाबतचे प्रश्न वरिष्ठ नेत्यांना विचारा, माझी तेवढी राजकीय उंची नाही असे राणेंनी नमूद केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Mla Vaibhav Naik News : नितेश राणे (mla nitesh rane) यांनी स्वतःचा पक्ष किती दिवसात विलीन केला याचा इतिहास पाहून नंतरच शिवसेनेवर टीका करावी असा उपरोधक टोला आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी लगावला आहे. शिवसेना पक्ष राष्ट्रवादीत विलीन होणार या राणेंच्या वक्तव्यावर नाईक बाेलत हाेते.  (Maharashtra News)

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना ही राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) पक्षात विलीन करावी असा प्रस्ताव गेला आहे असे म्हटलं आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक ठाकरेंचे आमदार घडयाळ चिन्हावर लढविणार आहेत आणि त्याची तयारी संजय राऊत यांनी केल्याचे राणेंनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांच्या विधानावर आमदार वैभव नाईक म्हणाले राणेंनी स्वतःचा पक्ष किती दिवसांत विलीन केला याचा इतिहास पाहून नंतरच शिवसेनेवर टीका करावी. नितेश राणे यांनी ED च्या भीतीने आपला पक्ष भाजपात विलीन केला. त्यांनी आपल्या मंत्रिपदाची चिंता करावी. तसेच वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची लोकप्रियता समजेल असा टोलाही वैभव नाईक यांनी नितेश राणेंना लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: लढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT