MLA Suresh Dhas on Sanjay Raut  SaamTV
महाराष्ट्र

Suresh Dhas : संजय राऊत इंटरनॅशनल स्पीकर, त्यांच्यावर बोलण्याइतकी माझी...; सुरेश धसांचा टोमणा

Suresh Dhas on Jarange Patil : श्री. क्षेत्र नारायण गडाची जमीन आहे ही जमीन गायरान जमीन आहे. श्री. क्षेत्र नारायण गड हा गायरान जमिनीमध्ये येत आहे आणि तो येत असल्यामुळे ही जमीन गडाच्या नावावर करण्यात यावी.

Prashant Patil

बीड : जरांगे पाटील हे जरी माझ्यावर रागावले असले तरी मला त्याचा राग नाही, आणि या संदर्भामध्ये आज मस्साजोग या ठिकाणी जी बैठक होत आहे. त्या बैठकीनंतर मी २० फेब्रुवारी रोजी प्रसार माध्यमांशी बोलणार आहे. त्याचबरोबर शिरूर नगरपंचायती संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की अशा छोट्या-मोठ्या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, आज सुरेश धस बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

श्री. क्षेत्र नारायण गडाची जमीन आहे ही जमीन गायरान जमीन आहे. श्री. क्षेत्र नारायण गड हा गायरान जमिनीमध्ये येत आहे आणि तो येत असल्यामुळे ही जमीन गडाच्या नावावर करण्यात यावी. या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांना भेटलो आहे. तर दुसरा विषय असा आहे की बिबट्याच्या संदर्भामध्ये याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा याबद्दल देखील आम्ही वनाधिकारी यांच्याशी भेटलो आहोत. आष्टी तालुक्यातील जे लघु सिंचन तलाव आहेत या तलावातील गाळ काढण्यासाठी देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे, असंही सुरेश धस यावेळी म्हणाले आहेत.

संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत त्यांच्यावर बोलण्याइतकी माझी लायकी नाही. कृषी विभागात जो घोटाळा झाला आहे त्यासंदर्भात मी आज काहीही भाष्य करणार नाही. कारण आज मस्साजोगला या संदर्भात बैठक चालू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT