Satara, Shivendraraje Bhosale , Udayanraje Bhosale , Grade Seprator Project saam tv
महाराष्ट्र

Satara News : हे उदयनराजेंच्या लहरीपणाचं काम : शिवेंद्रसिंहराजे

सातारकरांनी ग्रेड सेपरेटरचा वापर करावा यासाठी त्यामध्ये आता बदल होणार का हे पाहावे लागणार आहे.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale : साता-याच्या ग्रेड सेपरेटरवरुन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या (udayanraje bhosale) लहरीपणाचे हे काम आहे. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा हा प्रकार असल्याचे मत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर मांडले. शहरातील एका मंडळानं संबंधित ग्रेड सेपरेटरची जागा मंडळाच्या देखाव्यासाठी भाडेत्वावर द्यावी अशी पालिकेस मागणी केल्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंना (shivendraraje bhosale) छेडलं असता त्यांनी सातारकरांच्या (satara) मनातलं मंडळ बाेलत आहे असे म्हटलं.

खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरामधील पोवई नाका येथे ग्रेड सेप्रेटर हा प्रकल्प आणला. परंतु जेव्हा पासून हा प्रकल्प सुरू होऊन त्याच्या उद्घाटन होई पर्यंत आणि आता झाल्यावर देखील स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि नेते यांच्या टीकेच्या केंद्र बिंदू राहिला आहे. खासदार उदयनराजेंचा हा ड्रिम प्रोजेक्ट असला तरी या प्रकल्पाची साताऱ्याला गरज नसल्याने यावर आमदार शिवेंद्रराजेंनी वारंवार टीका केली आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले सातारा शहरातील लोकांना या प्रकल्पाचा काहीच लाभ होत नसल्याची टीका कायम होत राहिली आहे. आता एका नवरात्र उत्सव मंडळाने याबाबत अजब मागणी केली आहे. नवरात्रच्या दिवसात हा ग्रेड सेप्रेटर आमच्या मंडळाला भाड्याने द्यावा अशी उपहासात्मक मागणी केली आहे. या मंडळाची माहिती घेतली असता हे मंडळ अस्तित्वात नाही असे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

या एका अर्जामुळे ग्रेड सेप्रेटर बाबत विरोध सुरू झाला आहे. सोशल मीडियावर हा अर्ज व्हायरल झाल्यावर लोक देखील व्यक्त होत आहेत. या कामासाठी अंदाजे 75 कोटी एवढी रक्कम खर्च झाला आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने बनवल्यामुळे याचा वापर होत नसून केवळ तीस टक्के लोकच याचा वापर करत आहेत. यामध्ये बदल करून वाहतूक योग्य पद्धतीने वळवली नाही तर शासनाचे 75 कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT