Satara News , Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale , Kass Pathar saam tv
महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale : बगलबच्च्यांसाठी 'कास महोत्सव'; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर राेख

शासनाच्या पैशाची उधळपट्टी करणं याेग्य नाही असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता म्हटलं.

Siddharth Latkar, ओंकार कदम

Kass Pathar : बगलबच्च्यांची घरं चालवण्यासाठी शासनाचा पैसा खर्च करून 'कास महोत्सव' (Kass Mahotsav) आयाेजित करणं हे याेग्य नाही असे मत सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान या महाेत्सवाबाबत शासनाकडे तक्रार करणार असल्याचे आमदार भाेसले यांनी नमूद केले. (Maharashtra News)

आजपासून तीन दिवस सातारा जिल्हाधिकारी, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या वतीने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावरुन काही सामाजिक कार्यकर्त्यांसह लाेकप्रतिनिधींनी आक्षेप नाेंदविले आहेत. या ठिकाणी वृक्ष तोड देखील झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींत तीव्र नाराजी पसरली आहे. (Tajya Batmya)

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कास महोत्सवाचं आयोजन प्रशासनानं स्वत: करुन त्याच्या निधीचा याेग्य वापर केला पाहिजे हे पहावे. या महोत्सवाच्या नावाखाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यावर वन विभागाने संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा राजेंनी व्यक्त केली.

कुठल्यातरी लोकप्रतिनिधींच्या बगलबच्च्याची घरे चालवण्यासाठी शासनाचा पैसा खर्च करणे हे याेग्य नाही असे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता म्हटलं. शिवेंद्रराजे म्हणाले मी स्वत: याबाबतची तक्रार शासनाकडं करणार आहे.

आमदार शिवेंद्रराजे म्हणाले याचा खर्च शासन करत आहे का खासगी डान्स क्लास चालवणाऱ्याच्या आग्रहाखातर आणि लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर होत आहे ? अशी शंका उपस्थित होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा धंदा सुरू असल्याचे राजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT