shahjibapu patil 
महाराष्ट्र

तीन हजार सभासदत्व टिकण्यासाठी केलं; आमदार शहाजीबापू पाटील

भारत नागणे

पंढरपूर : सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटल्याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी घुमजाव केला आहे. सभासदत्व टिकावे यासाठी दिलेले योगदान आहे असे सांगत कारखान्यातील पैशाचा आणि याचा कुठेही संबंध नाही. केवळ कारखान्याचे संस्थापक भांबुरे यांच्या निधनानंतर कारखाना उभा राहावा यासाठीच केलेला हा प्रयत्न होता असे आमदार पाटील यांनी नमूद केले. mla-shahajibapu-patil-statement-on-sangola-factory-sml80

आमदार पाटील म्हणाले कारखान्याच्या उभारणी पूर्वीच निवडणूक लागली होती. त्यामुळे कारखान्याचे तीन हजार सभासदांचे सभासदत्व कायम राहावे यासाठी हे योगदान देण्यात आले आहे.

सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या प्रसंगी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी रविवारी जाहीर कार्यक्रमात कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना तीन - तीन हजार रुपये वाटप करून मटण आणि माशांची पार्टी दिल्याचे भाष्य जाहीर सभेत केले हाेते. त्यांच्या या वक्तव्यानंतर साखर कारखानदारीमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी घूमजाव करत सभासदत्व टिकून राहावे यासाठी केलेले योगदान असल्याचे आता म्हटले आहे. आमदार पाटील यांनी आपल्या वक्तव्य विषयी सारवासारव केली असली तरी त्यांच्या या वक्तव्यानंतर काही साखर कारखानदारीतील अनेक गुपिते मात्र उलगडली आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT