आमदार शहाजीबापू पाटलांचा सांगोला कारखान्या बाबत मोठा गौप्यस्फोट भारत नागणे
महाराष्ट्र

आमदार शहाजीबापू पाटलांचा सांगोला कारखान्या बाबत मोठा गौप्यस्फोट

सभासदांना पैसे वाटून कारखान्याची निवडणूक लढवली - शहाजीबापू पाटील

भारत नागणे

पंढरपूर - सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन -तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना मटन आणि माशांची पार्टी ही दिली. त्या काळात 57 लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात केला.

आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटा नंतर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत होणाऱ्या गैर प्रकाराचे जळजळीत सत्य आणि वास्तव समोर आले आहे. सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या दुरावस्थेला मी स्वतः काही प्रमाणात जबाबदार असल्याची जाहीर कबुली देत, याच कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांची माफी देखील मागितली.

हे देखील पहा -

वाकी शिवणे (ता.सांगोला) येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना अलीकडेच राज्य सहकारी बॅंकेने पंढरपूर येथील उद्योगपती धनंजय पाटील यांच्या धाराशिव साखर कारखान्याला 25 वर्षाच्या भाडेपट्टा कराराने चालवण्यास दिला आहे. धनंजय पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात कारखाना सुरु केला. आज कारखान्याचा प्रथम गळित हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला.

याच कार्यक्रमात या कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार शहाजी पाटील यांनी कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि त्यांना मटन खायला घालून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिस्सका दाखवला हे सांगताना त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीत आपण कसा प्रताप केला हे देखील सांगितले आहे. कारखान्याच्या दुरावस्थेला माझ्या सह सर्वच नेते जबाबदार आहेत. मी देखील तितकाच पापी असल्याची कबुली देत पाटील यांनी याच जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांची माफी देखील मागितली.

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. ऐवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकी दरम्यान 1700 सभासदांना कोल्हापूरात ठेवले. त्या ठिकाणी त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणार्या पैसे ही दिले.असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.

आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैर कारभार केला याची उदाहणे देत, कारखान्याच्या दुरावस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले.आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटा नंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यात चालणाऱ्या गैर कारभाराचे सत्य समोर आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT