mla santosh bangar, viral video, video viral saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : काम बंद करून गाड्या जाळून टाकु... CM शिंदेंच्या आमदाराचा Video Viral

दरम्यान जखमी मजुराला मदत करण्यासाठी केला हाेता आमदार बांगर यांनी फाेन.

संदीप नागरे

Mla Santosh Bangar Viral Video News : हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (mla santosh bangar) यांचा पुन्हा एकदा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील कडपदेव परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावर जखमी झालेल्या मजुराला कॉन्ट्रॅक्टर उपचारासाठी पैसे देत नसल्याने आमदार संतोष बांगर हे चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. (Breaking Marathi News)

तुमच्या कामावर काम करणारा मजूर जखमी झाला आणि त्याला तुम्ही नुकसान भरपाई का देत नाही, असे म्हणत आमदार संतोष बांगर यांनी ताबडतोब नुकसान भरपाई न दिल्यास तुमचे काम बंद करून तुमच्या गाड्या जाळून टाकू अशी थेट धमकीच दिली आहे. दरम्यान मारुती डाखोरे असे जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे.

आमदार बांगर यांच्या धमकीवजा इशाऱ्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टर मजुरावर उपचार करण्यासाठी पैसे देत असल्याचे आश्वासन देताना दिसत आहे. मात्र कायदेशीर गोष्टींचा अवलंब न करता वारंवार मारहाण करणे, धमकी देणे, शिवीगाळ करणे या प्रकाराला राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आवर घालणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

SCROLL FOR NEXT