Mla Sanjay Shirsat Son Siddhant Sirsath Audio Call Viral Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad : वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागितले; शिंदे गटातील आमदाराच्या मुलाकडून थेट हातपाय तोडण्याची धमकी!

संजय सिरसाट यांचे पुत्र सिद्धांत सिरसाट यांनी थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं बोललं जातंय.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील नेते तसेच मंत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडत आहे. आता त्यामध्ये आमदाराच्या मुलाचीही भर पडली आहे. औरंगाबादेतील शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांच्या मुलाने एका केटरिंग व्यावसायिकाला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

केटरिंग व्यावसायिकाने वाढदिवसाच्या पार्टीचे बिल मागितले म्हणून आमदार संजय सिरसाट यांचे पुत्र सिद्धांत सिरसाट यांनी थेट हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं बोललं जातंय. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय संभाषण झालं?

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक केटरिंग व्यावसायिक एका व्यक्तीला फोन लावतो. साहेबांनी आपल्याला ४० हजार रुपये द्यायचं सांगितलं पण मुळात २० हजार रुपयेच दिले असल्याचं व्यावसायिक म्हणतो. यावर उत्तर देताना समोरील व्यक्ती म्हणतो, साहेबांनी जेवढे पैसे सांगितले आहे तेवढेच पैसे तुला दिले आहे, आता यानंतर नाही भेटायचं.

पुढे बोलताना व्यावसायिक म्हणतो, भाऊ अजून २० हजार रुपये बाकी आहे. यावर समोरचा व्यक्ती म्हणतो, डोकं खराब करायचं नाही, उपकार केले आहेत का तू? यावर व्यावसायिक म्हणतो, भाऊ अशी भाषा वापरू नका माझ्या कामाचे पैसे आहेत, ते देऊन टाका. यावर समोरचा व्यक्ती म्हणतो कोणत्या कामाचे पैसे आहेत? यावर व्यावसायिक म्हणतो कामाचे पैसे घ्यायला मी ऑफिसवर येतो, यावर समोरील व्यक्ती हा परत आलात तर तुझे हातपाय तोडेन, अशी धमकी देताना दिसून येत आहे.

दरम्यान, हा व्यक्ती दुसरा कुणी नसून शिंदे गटातील आमदार संजय सिरसाट यांचा मुलगा सिद्धांत सिरसाट हे असल्याचं बोललं जातंय. याबाबत सिद्धांत सिरसाट यांना विचारलं असता, सदरील व्यावसायिक हा सात वर्षानंतर ब्लॅकमेलिंग करीत पैसे मागत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT