sachin kalyanshetti, barshi saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : 'गुवाहाटीच्या राजकीय स्फोटाची बत्ती खऱ्या अर्थानं बार्शीत पेटली'

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात आमदार कल्याणशेट्टी बाेलत हाेते.

विश्वभूषण लिमये

गुवाहाटीच्या राजकीय स्फोटाची बत्ती खऱ्या अर्थानं बार्शीतच पेटली असा गाैप्यस्फाेट भारतीय जनता पक्षाचे आमदार भाजपचे साेलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे. यामुळे साेलापूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चांना ऊत आला आहे. (sachin kalyanshetti latest marathi news)

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले कोरोनाकाळात देवेंद्र फडणवीस बार्शीत (barshi) आले होते. तेव्हा त्यांना आमदार राजेंद्र राऊत यांनी भगवंत मंदिरात घेऊन गेले. राज्यातील सरकार पडून भाजपची सत्ता यावी असे साकडे घातले. वर्षभरात सत्ता पडली. त्यामुळे गुवाहाटीच्या राजकीय स्फोटाची बत्ती बार्शीतच पेटली असा ठाम विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवा'चा समारोपा प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बाेलत हाेते. (Maharashtra News)

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क निघायला सुरुवात झालीय. 'काय झाडी, काय डोंगर' फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे सोलापूर जिल्ह्यातलेच आणि आता भाजपच्या (bjp) जिल्ह्याध्यक्षांनी अशा पद्धतीच विधान केल्यामुळे उलटसुलट राजकीय चर्चांना ऊत आला आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT