आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण  Saam Tv
महाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत असे देखील आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. असे असताना काही राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येत आहे. आता राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत याबाबाद माहिती दिली आहे.

ट्विट करत म्हणले की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत असे देखील आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना पाठोपाठ ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासात राज्यात ओमिक्रॉनचे नवे 68 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या 578 वर गेली आहे. 578 पैकी 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मुंबईत 40, पुणे शहरात 14 नवे रुग्ण रुग्ण आढळले आहेत. नागपुरातही 4 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात डेल्टा व्हेरियंटनंतर तिसरी लाट ही ओमिक्रॉनची असेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे, त्यामुळे सराकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात कोरोनाने (Corona) देखील आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासात राज्यात 12,160 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे, तसेच 1,748 रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. तसेच गेल्या २४ तासात कोरोनामुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात सध्या 52,422 अॅक्टीव रुग्ण आहेत. त्यामुळे आगामी काळात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. देशाबरोबरच राज्य सरकारने ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आपले प्रयत्न सुरु केले आहेत. नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT