Rohit Pawar SaamTvNews
महाराष्ट्र

नवनीत राणांची भाषा भाजपची, कदाचीत त्यांना पुन्हा...; रोहित पवारांचे टिकास्त्र

निवडून येण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून विरोधकांनी टिका करणं सुरु केलं असलं तरी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) मात्र आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली आहे. निमंत्रण आल्यास मि सुद्धा त्यांच्यासोबत आयोध्या दौऱ्यावर जाईल असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांना टार्गेट केलं जात असून हे आम्हाला नाही तर राज्याच्या संस्कृतीला टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून मुंबई महापालिकेची निवडणूक आयोग डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आता भाजपची भाषा बोलू लागल्या असून त्यांचं पद टिकवण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना तिकीट हवं असेल म्हणून त्यांनी भूमिका बदलली असावी असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे. शिवाय निवडुन येण्यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार 3 महिन्यात कोसळेल असं भाकीत विरोधक वर्तवत होते मात्र आज या सरकारला 3 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणतेही आमदार भाजपच्या संपर्कात नसल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT