mla prakash solanke, beed saam tv
महाराष्ट्र

Prakash Solanke: सोळंके यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयने सुनावली ३ दिवसांची पोलीस कोठडी

MLA Prakash Solanke Audio Clip: न्यायालयासमोर त्याला हजर केले असता भोसलेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणामुळे काही दिवसांपूर्वी जालना आणि बीडमधील वातावरण चांगलंच तापलं होतं. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं घरही जाळलं होतं. सोळंके यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावर आता सोळंकेच्या संभाषणाची क्लिप व्हायरल करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुंदर भोसले असं ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. प्रकाश सोळंके यांच्याशी फोनवर बोलताना त्यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल करणाऱ्या सुंदर भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसेच न्यायालयासमोर त्याला हजर केले असता भोसलेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्या ३० ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकांनी जाळल्या होत्या. आमदार प्रकाश सोळंकेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. आमदार सोळंकेंच्या घरावर दगडफेक प्रकरणी पोलिस मागील तिन दिवसांपासून अॅक्शन मोडमध्ये असून आतापर्यंत २८ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी काल छत्रपती संभाजीनगरला जाऊन मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली. आमदार प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती त्यांनतर प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. समाजामध्ये माझ्या या ऑडिओ क्लिप संदर्भात गैरसमज पसरवण्यात येत असल्यामुळे आपली बाजू मनोज जरंगे पाटील यांच्याकडे मांडण्यासाठी सोळंकेंनी त्यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT