khoskar uike Saam Tv News
महाराष्ट्र

Hiraman Khoskar: सत्ताधारी भिडले! खोसकरांचा आरोप, ऊईकेंचं प्रत्युत्तर; वाद वरिष्ठांच्या कोर्टात

Khoskar vs Uike: सेंट्रल किचनची आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यादरम्यान, आश्रम शाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचं उघड झालं. मात्र, मंत्री ऊईके यांनी प्रत्युत्तर देत वेगळाच खुलासा केला.

Bhagyashree Kamble

नाशिकच्या मुंडेगावातील सेंट्रल किचनची आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यादरम्यान, आश्रम शाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचं उघड झालं. मात्र, १३ डिसेंबरला आदिवासी विकास मंत्री नाशिक दौऱ्यावर होते, सेंट्रल किचनमध्ये उत्कृष्ट दर्जाचे अन्न मुलांना देण्यात येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हाच खुलासा केल्यानंतर खोसकर नाराज झाले असून, सॅम्पल घेऊन वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंडेगावातील सेंट्रल किचनची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर आश्रम शाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचं उघड झालं. पण आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी पाहणी दौऱ्यावर असताना, या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे अन्न मुलांना देण्यात येत असल्याचा खुलासा केला.

हाच खुलासा केल्यानंतर आमदार हिरामण खोसकर यांनी मंत्री अशोक ऊईके यांच्यावर नाराजी व्यक्त केली. मंत्री अशोक ऊईके हे अधिकारी आणि ठेकेदाराला पाठीशी घालत असून, आदिवासी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला तंबी द्यायची सोडून मलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप खोसकर यांनी केला आहे.

नाराजी व्यक्त केल्यानंतर विभागीय आयुक्तांची भेट घेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची करणार असल्याचं खोसकर यांनी सांगितलं. तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न आदिवासी मुलांना देण्यात येत असल्याचा पुरावा घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना या संदर्भातील माहिती देणार, असं खोसकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT