Padalkar Vs Awhad Saam Tv
महाराष्ट्र

सहकाऱ्यांकडून चूक झाली? विधानभवनाच्या राड्यावर पडळकरांची प्रतिक्रिया

Gopichand Padalkar on Vidhan Bhavan Rada News : विधानसभा परिसरात झालेल्या हाणामारीवर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चूक झाल्याचे मान्य केले.

Namdeo Kumbhar

Gopichand Padalkar vs jitendra awhad Vidhan Bhavan Rada News : विधानभवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी विधानभवनाच्या आवाराज जोरदार हाणमारी झाली. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारलं, याचे व्हिडिओ समोर आले अन् महाराष्ट्राची मान शरमेनं झुकली. पोलिसांनी पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत अटक केली. आव्हाड यांनी पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले, यावर आमदार पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही कोर्टात लढायला तयार आहोत, आम्ही कायद्याला माणणारे कार्यकर्ते असल्याचं ते म्हणाले. आमच्या सहकाऱ्याकडून चूक झाल्याचेही पडळकर म्हणाले.

आमच्या सहकाऱ्याकडून चूक झाली. आमच्याही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालाय, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आम्ही कायद्याला माणणारे आहोत. कारवाईला सामोरं जायला तयार आहोत, कोर्टात आम्ही आमची बाजू मांडू असे पडळकर म्हणाले. त्याशिवाय आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीची मोडतोड केली, हे बरोबर आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या घटनेवर काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली. आमच्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली, त्यांना ताकिद दिली आहे. तुम्ही जी काही कारवाई करायची ती करू शकता, असं अध्यक्षांसोबत बोलणं झालं होतं. अध्यक्षांच्या अधिकारातील हा विषय आहे. त्यामुळे ते कारवाई करतील ती मान्य असेल. रात्री उशिरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभा अध्यक्षांनी जी भूमिका घेतली, त्यावर कोणतेही मत नाही, कायद्याला माणणारे कार्यकर्ते आहोत. जी कारवाई झाली, त्याला कोर्टात सामोरं जायला तयार आहे, असे पडळकर म्हणाले. पोलिसांच्या गाडीसमोर झोपणे किंवा अडवणे, मोडतोड करणं ही गुंडगिरी नाही का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT