Bacchu Kadu Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Bacchu kadu : बच्चू कडूंना राग अनावर; थेट कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, VIDEO व्हायरल

अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातल्या गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी कामकाजासंदर्भात त्यांचा वादविवाद झाला. या वादातच बच्चू कडू यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे, साम टिव्ही

अमरावती : अमरावतीचे (Amravati) अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते कार्यकर्त्याला मारहाण केल्याने चर्चेत आले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Bacchu Kadu News Today)

नेमकं काय घडलं?

अमरावतीच्या अचलपूर (Achalpur) तालुक्यातल्या गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी कामकाजासंदर्भात त्यांचा वादविवाद झाला. या वादातच बच्चू कडू यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. ही व्यक्ती प्रहारचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

यावेळी कार्यकर्ता आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होत असून यात ‘ऐकून घे आधी, शांत बस!’, असं म्हणत बच्चू कडू एका व्यक्तीला कानाखाली मारताना दिसत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पृथ्वीचा अंत जवळ आलाय? सावधान! मुंबई लवकरच बुडणार?

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

Maharashtra Live News Update: अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT