Beed News: बीड जिल्ह्यात कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आमदार अन राजकिय गुंडांची दहशत पाहायला मिळत आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी बीड शहरात भर दिवसा कृषी सहाय्यकावर जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये कृषी सहाय्यकाचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला असून पुणे येथील रुग्णालयात गंभीर जखमी कृषी सहाय्यक मृत्यूची झुंज देत आहे. (Latest Marathi News)
या घटनेनंतर दोन दिवसानंतर विधान परिषद आमदाराने कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांना मारहाण करण्याची धमकी दिली असून जीवे देखील मारू असा दम देखील भरला आहे. त्यानंतर कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्या विधान परिषद आमदाराच्या दबावाचा आणि प्रवृत्तीचा पाढाच वाचला आहे
दरम्यान त्याच दिवशी आमदार सुरेश धस आणि जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यात खडाजंगी झाले होती. दरम्यान त्यानंतर आता जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर हे रजेवर गेल्याची माहिती मिळत आहे.
ऐन खरिपाच्या हंगामाच्या तोंडावर कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर असे हल्ले आणि दबाव चांगले नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ देखील होऊ शकते.
परळीच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी बजावला मतदानाचा हक्क
मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पनाला लागलेल्या, परळीच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक तब्बल 13 वर्षानंतर पहिल्यांदाच होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी नुकताच मतदानाचा हक्क बजावला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदारांशी संवाद साधला.
या निवडणुकित 1 हजार 231 मतदार हे 32 जागेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान परळी शहरातील सर्वात मोठ्या अशा जवाहर एज्युकेशन सोसायटी, या शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत मुंडे बहीण भावांमध्ये कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.