Misbehavior Of Lovers In Running Car Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: धावत्या कारच्या स्टिअरिंगवर बसून प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे; नागपुरातील धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Misbehavior Of Lovers In Running Car Nagpur: धावत्या कारमध्ये प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असल्याचं समोर आलंय. नागपुरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपुरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. धावत्या कारमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे समोर आलेत. नागपुरातील उच्चभ्रू भाग असलेल्या धरमपेठ भागात हा धक्कादायक प्रकार प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात चर्चा रंगल्या आहेत. या जोडप्याचे धावत्या कारमध्ये अश्लील चाळे सुरू होते, तेव्हा बाजूने जाणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ काढला. त्यानंतर हे प्रकरण समोर आलंय.

काय आहे घटना?

या व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्त्यावर दुतर्फा गाड्या येत जात आहे. यादरम्यान या गाडीमधील तरूण गाडी चालवत आहे, तर तरूणी त्याच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करताना दिसत आहे. कार चालवीत असलेल्या तरुणाच्या मांडीवर बसून अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल (Misbehavior Of Lovers) झालाय.

धावत्या कारमध्ये अश्लील चाळे

अतिशय धोकादायक पध्दतीने तरुणी स्टिअरिंगवर बसलेली असून तरूणासोबत अश्लील चाळे करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रस्त्याने जाणारे येणारे लोक बघत असताना देखील या जोडप्याचे अश्लील चाळे सुरूच (Misbehavior Of Lovers In Running Car) होते. त्यांना काहीही फरक पडत नसल्याचं दिसतंय. लक्ष्मीभुवन चौक ते शंकरनगर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलाय. या जोडप्याने त्यांच्यासोबत इतरांचाही जीव देखील धोक्यात घातल्याचं दिसतंय. या प्रकारामुळे अपघात होण्याची देखील शक्यता वर्तविली जातेय.

तरूणाच्या मांडीवर बसली अन्...,

नागपूरमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात व्हायरल झाला (Nagpur News) होता. त्यानंतर पोलीस याप्रकरणी अॅक्टीव्ह मोडवर आले होते. त्यांनी कारवाई करत या जोडप्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये तरूण सीए तर तरूणी इंजिनीयर असल्याचं उघड झालंय. हा प्रकार १५ जूलै रोजी सायंकाळी घडला असल्याची माहिती (Viral Video) मिळतेय. व्हिडिओमध्ये त्यांच्या गाडीचा क्रमांकही स्पष्ट दिसत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT