merra sahab darga miraz 
महाराष्ट्र

माेहरम २०२१ : पंजे बसवताना शेकडाेंचा जमाव; ३० जणांवर गुन्हा दाखल

विजय पाटील

मिरासाहेब दर्गा ही मिरजच्या रेल्वे स्टेशनजवळ स्थित मुस्लिम आणि हिंदू दोन्ही समुदायांसाठीच एक उपासना केंद्र आहे. दरवर्षी या ठिकाणी हजाराे भाविक भेट देत असतात.

सांगली : मिरज येथे मोहरम muharram सणाच्या निमित्ताने मिरासाहेब दर्गा merra sahab darga miraz येथील समोरील बाजूस मोहरम खाण्यामध्ये पंजे बसविण्याचा कार्यक्रम सुरू होता. या ठिकाणी माेठ्या संख्येने गर्दी केल्याने पाेलिस प्रशासनाने सुमारे ३० जणांवर काेविड १९ च्या नियम व अटींचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

काेविड १९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने गर्दी होणारे सण ,यात्रा ,उरूस यांच्यावर बंदी घातली आहे. माेहरम देखील साध्या पद्धतीने साजरा करा असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. माेहरमला मिरवणुका नकाेत असेही स्पष्ट केले आहे.

मिरज येथील मिरासाहेब दर्गा नजीक पंजे स्थापने वेळीस सुमारे ४०० ते ४५० जणांचा जनसमुदाय गाेळा झाला होता. यामुळे काेविड १९ अंतर्गत दिलेल्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी पाेलिसांनी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिरज शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार मिरासाहेब खादिम जमात प्रमुख अजगर शरीकमसलत मिरासाहेब दर्गा ट्रस्टी अब्दुल मुजीब अब्दुल अजीज मुतवल्ली जणीब मेहबूब मुश्रीफ यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी चार तासाची विशेष सवलत

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT