Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : वृध्द महिलेची साडे पंधरा लाखाची फसवणूक; सीबीआय व कस्टम अधिकारी असल्याचे सांगत केला बनाव

Mira Bhayander News : दिल्लीमधून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगत या महिलेस फोन करून आपले एक पार्सल दिल्लीमध्ये आले आहे. त्यामध्ये ५८ एटीएम कार्ड, १६ पासपोर्ट तसंच एमडी अमली पदार्थ सापडले आहे.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे
मिरा भाईंदर
: मिरारोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेची साडेपंधरा लाख रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात समोरच्याने सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासवून फसवणूक केली आहे. या प्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरारोड पोलीस करत आहे.

सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या कल्पना लढवत फसवणूक केली जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. फोनवरून संपर्क करून कधी पोलीस असल्याचे बनाव केला जातो. तर कधी पार्सल आल्याचे सांगत समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली जात आहे. असाच प्रकार मीरा रोड परिसरात घडला असून यात वृद्धेची फसवणूक करण्यात आली आहे. 

दरम्यान मी दिल्लीमधून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगत या महिलेस फोन करून आपले एक पार्सल दिल्लीमध्ये आले आहे. त्यामध्ये ५८ एटीएम कार्ड, १६ पासपोर्ट तसंच एमडी अमली पदार्थ सापडले आहे. असे वृद्धेला खोटे सांगून हे प्रकरण मिटवायचे असल्यास पंधरा लाख रुपयांची मागणी त्याने केली. रक्कम दिली नाही तर आपल्या सोबत आपल्या मुलाला देखील जेलमध्ये टाकण्यात येईल अशी धमकी दिली. 

दुसऱ्यांदा कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले 

या भीतीपोटी महिलेने सुरुवातीला ५० हजार रुपये संबंधित इसमाच्या खात्यात जमा केले. त्यानंतर पुन्हा अधिक एका नंबर वरून फोन आला. यावेळी कस्टम अधिकारी बोलतोय असे सांगून पुन्हा पैशाची मागणी केली. असे एकूण १५ लाख रुपये या महिलेकडून उकळण्यात आले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असता संबंधित महिलेने मिरारोड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे.


भारतीय न्याय संहिता कायदा कलमासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमा अंतर्गत मिरारोड पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कावडे तपास करत आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. अनोळखी इसमाचा कॉल आला व पैश्याची मागणी केली तर तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा कंट्रोल रूमची संपर्क साधावा नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

SCROLL FOR NEXT