Terrorist Threat SAAM TV
महाराष्ट्र

Mira Bhayander Police Received Threat Call: मीरा भाईंदर पोलीसांना अज्ञात व्यक्तीचा फोन, दिली घातपात घडवण्याची धमकी

Mira Bhayander News: पोलीस नियंत्रण कक्षाने तातडीने अज्ञात व्यक्तीच्या फोन क्रमांकाची तपासणी केली. यात पोलिसांसमोर दोन फोन क्रमांकांवरून आले.

Chandrakant Jagtap

Mira Bhayandar News: अज्ञात व्यक्तीने मीरा भाईंदर पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून अतिरेकी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. मीरा भाईंदर शहरात दोन अतिरेकी हल्ले करणार असल्याचा दावा कॉलवरून व्यक्तीने केला. यानंतर पोलीस मुंबई पोलीसांकडून कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तिचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा भाईंदर नियंत्रण कक्षाला बुधवारी अज्ञात व्यक्तीने फोन करून मीरा भाईंदर शहरात दोन अतिरेकी हल्ला करणार असल्याची धमकी दिली. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने तातडीने अज्ञात व्यक्तीच्या फोन क्रमांकाची तपासणी केली. यात पोलिसांसमोर दोन फोन क्रमांकांवरून आले. (Marathi Tajya Batmya)

यातील एक कॉल हा मुंबईच्या दहिसर परिसरातून आल्याचे निष्पन झाले आहे. दोन क्रमांकांपैकी एक क्रमांक देह व्यापार करणाऱ्या महिलेचा आहे. अधिक तपास केला असता देह व्यापार करण्याऱ्या महिलेने कोणत्यातरी ग्राहकाने भांडणाचा राग काढून माझा फोन क्रमांक व्हायरल केल्याची माहिती दिली आहे. (Breaking News)

या संदर्भात मुंबई नियंत्रण कक्ष या फोन क्रमांकाचा सखोल तपास करत आहे. यापूर्वी देखील मीरा भाईंदर पोलीस नियंत्रण कक्षाला दोन वेळा घातपात आणि अतिरेकी हल्ल्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT