Mira Bhaynder News Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhaynder News : प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरी टाकला दरोडा; नकली बंदुकीचा धाक दाखवून १० लाख लांबवीले

Mira Bhayander News : ३० सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि एक महिला बुरखा घालून घरात घुसले होते. त्यांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रुपये लंपास केले

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 

मीरा भाईंदर : मीरा भाईंदरच्या काश्मीर परिसरात दरोडा टाकण्याची घटना घडली होती. यात सुमारे १० लाख रुपयांची रोकड लांबविण्यात आले होते. नकली बंदुकीचा धाक दाखवून भाच्याने प्रेयसीच्या मदतीने मामाच्या घरी दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मीरा भाईंदरच्या (Mira Bhayander) काशीमीरा परिसरातील जनता नगरमध्ये हि धक्कादायक घटना घडली होती. यात ३० सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि एक महिला बुरखा घालून घरात घुसले होते. त्यांनी नकली बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रुपये लंपास केले. घडल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारी नंतर पोलिसांनी सिसिटीव्ही कॅमेरे तपासले असता एका वाहनातून हे तिघे पसार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याआधारे पोलिसांनी (Police) शोध घेत एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. 


भाच्याने रचला कट 

लोन ऍपमधून आठ लाखांचे कर्ज झाले होते. यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज असल्याने दूध विक्रेता मामाकडे रोख रक्कम असल्याची माहिती होती. त्यानुसार प्रेयसी आणि काकाच्या मदतीने मामाच्या घरात चोरी करण्याचा प्लॅन भाच्याने आखला होता. त्यानुसार चोरी करण्यात आली. काशीगाव पोलिसांनी तिघांना अटक केली असून १० लाख रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT