Mira Bhayandar Crime News:  Saam Tv
महाराष्ट्र

Mira Bhayandar Crime: घरात घुसला, ओढणीने हातपाय बांधले अन् अत्याचार केला; भाईंदरमधील धक्कादायक घटना

Mira Bhayandar News: मिरा भाईंदरमध्ये एका नराधमाने महिला एकटीच घरात असल्याचं पाहून तिचे हातपाय तोंड ओढणीने बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Saam Tv

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मिरा भाईंदरमध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथे एक महिला घरात एकटी असल्याचं पाहून एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिकांच्या मदतीने या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिनांक १४ सप्टेंबर रोजी भाईंदरमध्ये रात्री ११ वाजेच्या सुमारास महिलेला एकटी घरात पाहून आरोपी गौतम घरात घुसला. यानंतर त्याने महिलेचे हातपाय आणि तोंड ओढणीने बांधले आणि अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने घरातच दरवाजा बंद करून महिलेसमोर मध्यपान केले. नंतर पुन्हा महिलेवर अत्याचार केला.

आरोपीने हातपाय, तोंड बांधल्याने महिलेला बाहेर येण्यास अडचण होत होती. महिलेने शौचालयात जाण्याचा बहाना करत कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. यानंतर महिलेने शेजारी राहणाऱ्या घरमालकाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारी राहणारे घरमालक देखील घरात नव्हते.

त्यानंतर महिलेने परिसरात आरडाओरड केली, हे पाहताच आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेच्या वेळी महिलेची लहान मुलगी वय वर्षे तीन ही चिमुकली घरात झोपलेली होती. सुदैवाने या घटनेत ती बचावली आहे.

दरम्यान, मिरा-भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयामध्ये दिवसेंदिवस वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दिनांक १५ रविवार दिवशी आरोपी गौतम पुन्हा याच परिसरात फिरत असल्याचा स्थानिकांच्या निदर्शनास आले.

पीडित महिलेने ओळख पटवून दिल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. भाईंदर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी विरोधात चोरी, विनयभंग सारख्या चार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT