औरंगाबाद हादरलं! अल्पवयीन बहिणीवर भावाचा बलात्कार Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद हादरलं! अल्पवयीन बहिणीवर भावाचा बलात्कार

औरंगाबाद येथील गोलवाडी परिसरामध्ये एका तरुणाने आपल्याच मावस बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) येथील गोलवाडी परिसरामध्ये एका तरुणाने आपल्याच मावस बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेबरोबर वारंवार लैंगिक संबंध (Sexual relation) ठेवल्यामुळे पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदर (pregnant) राहिली आहे. घाटी रुग्णालयामध्ये (hospital) पीडितेची प्रसूती झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी छावणी पोलीस (Police) ठाण्यात बलात्कारासह (abuse) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम मावस भावाला अटक (arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी औरंगाबाद येथील गोलवाडी परिसरामधील रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून पीडितेचा मावस भाऊ तिचे लैंगिक शोषण करत होता.

हे देखील पहा-

आरोपी भावाने पीडितेवर वारंवार बलात्कार केल्यामुळे ती ७ महिन्यांची गरोदर राहिली होती. दरम्यान पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाईकांनी तिला २९ डिसेंबर दिवशी घाटी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी डॉक्टरांनी पीडित मुलीची तपासणी केली असता, ती ७ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी ७ महिन्यांची गर्भवती असल्याचे ऐकून कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला. ७ महिन्यांची गरोदर असतानाच, पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली आहे.

या प्रकरानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मावस भावानेच बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी मावस भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम भावाला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी बाळाचा डीएनए नमुना घेतला असून तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवला आहे. आरोपी भाऊ सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास छावणी पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT