Ulhasnagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Ulhasnagar Crime News: प्रसाद आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरात बोलावलं; नंतर केलं धक्कादायक कृत्य

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरूद्वारात वाटप करण्यात येत असलेला प्रसाद घरी घेऊन ये, असं सांगत प्रसाद घेऊन घरी आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गुरुद्वारामधील एका पाठीने लगट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. अवतार सिंग असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाठीचे नाव आहे. तो उल्हासनगर मधील गुरुद्वारात ग्रंथ पठण करणारा सेवक आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) आपल्या कुटुंबासोबत राहते. पीडिता दररोज उल्हासनगर येथील एका गुरुद्वारात ध्यान साधना करण्यासाठी जात असते. याच गुरुद्वारामध्ये अवतार सिंग ग्रंथ पठण करणारा सेवक आहे.

पीडितेचे दररोज येणे-जाणे असल्याने तिचा आणि अवतार सिंगचा परिचय होता. काही दिवसांपूर्वी अवतारने या अल्पवयीन मुलीला फोन करत गुरुद्वारात वाटत असलेला कढी चावलचा प्रसाद माझ्या घरी घेऊन ये असं सांगितले. (Breaking Marathi News)

प्रसाद घेऊन घरी आलेल्या अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तिथून पळ काढला. घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) अवतार सिंग विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

SCROLL FOR NEXT